न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. ऑगस्ट. २०२०) :- सेवानिवृत्त कर्मचा-यांनी आपले आरोग्य जपावे आणि आनंदी जीवन जगावे असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले. माहे एप्रिल २०२० मध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांचा सत्कार समारंभ आज स्थायी सभागृहात आयोजित करण्यात त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, बाळासाहेब कापसे, योगेश रसाळ, मिलिंद काटे, योगेश वंजारे, नवनाथ शिंदे, अमित जाधव, तुषार काळभोर, निलेश घुले, गणेश भोसले उपस्थित होते.
कोरोना आजाराच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनमुळे माहे एप्रिल मध्ये सत्कार समारंभ घेण्यात आलेला नव्हता तो आज पार पडला. आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त सत्कार झालेल्यांमध्ये मुख्यध्यापिका रोहिणी जोशी, उपलेखापाल राजेंद्र मेमाणे, मुख्य आरोग्य निरिक्षक जगदिश गायकवाड, मुख्य लिपिक सुनंदा तोडकर, दत्तात्रय आंत्रे, नारायण कोडितकर, विलास बाणेकर, सिस्टर इनचार्ज माणिक ढिलपे, वाहनचालक विलास थोरात, फार्मासिस्ट संजय तिवाटणे, उपशिक्षक कांता वाघमारे, सुनंदा कदम, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सुरेश धरत, वायरमन दत्तात्रय भोसले, लिडिंग फायरमन शिवाजी ताकवले, वायरलेस ऑपरेटर सुरेश पवार, वॉर्ड बॉय रमेश आगळे, मजुर नरेश कांबळे, शिपाई पिराजी भोसले, हनुमंता पुंडा, सफाई कामगार लताबाई मागाडे, प्लंबर मनोजकुमार कांबळे, फायरमन शंकर पाटील यांना सन्मानित करण्यात आले. तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या मुख्यध्यापिका रत्नमाला आढाव, लॅब टेक्निशियन जयश्री काळे, सफाई कामगार सुजाता पंडीत, मंगला पाटेळे, महेंद्र साकळे, कचरा कुली दाऊद मुंडे, मुरलीधर गाडे यांचा देखील करण्यात आला.














