न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शुक्रवारी (दि. २८ ऑगस्ट) रोजी १००६ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा ०७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात दिघी (स्त्री वय ६५), भोसरी (पुरूष वय ७८), शिंगोली (पुरूष वय ६७), देहूगाव (पुरूष वय ५७), मुळशी (पुरूष वय ७३), तळेगाव (स्त्री वय ६५), आळंदी (पुरूष वय ७४) येथील रुग्णांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ४६५१६ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील एकूण ८५२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३२१०९ वर पोहोचली आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.














