न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेचे नवीन अर्ज भरण्यासाठी पाच हजार रुपयांचा लागणारा डीडी तत्काळ रद्द करून निःशुल्क अर्ज स्वीकारण्यात यावेत, या मागणीसाठी शुक्रवारी (दि. २८) उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना बहुजन सम्राट सेना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपच्य वतीने निवेदन देण्यात आले.
सदरील मागण्यांचा व सकारात्मक विचार केला जाईल, असे आ आश्वासन अजित पवार यांनी दिले. त्यावेळी पवार यांनी आयुक्त हर्डीकर यांना या मागणीची तत्काळ अंमलबजावणी करावी, असे आदेश दिले.
महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेसाठी १५ ऑगस्टपासून नागरिकांचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली आहे. च-होली, बो-हाडेवस्ती, रावेत येथे ३ हजार ६६४ घरे उपलब्ध होणार आहेत. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरतांना पाच हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट भरणे बंधनकारक आहे.














