न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९. ऑगस्ट. २०२०) :- महाराष्ट्रासह पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे मंदिरे, देवस्थाने, गुरूद्वारा, बुद्धविहार, जैन स्थानके भाविक भक्तांसाठी सुरू करून दर्शनासाठी खुले करावेत या मागणीकरीता, महाराष्ट्रातील आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने शहराध्यक्ष आ. महेश लांडगे व आ. लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वात पुणे जिल्हा व संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचे श्रद्धास्थान असलेले श्रीमन् महासाधू मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदीराच्या आवारात ‘घंटानाद आंदोलन’ करण्यात आले.
निवडक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टंस नियमांचे पालन करीत झालेल्या आंदोलनात भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस अमोलजी थोरात, मा.नगरसेवक व सरचिटणीस राजाभाऊ दुर्गे, चिंचवड-किवळे मंडलाचे अध्यक्ष योगेशजी चिंचवडे, नगरसेवक राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, सांस्कृतीक आघाडीचे अध्यक्ष धनंजय शाळिग्राम तसेच चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने या आंदोलनास पाठिंबा देण्याकरीता स्वप्निल महाराज देव, वरद देव, व्यापारी संघटनेच्यावतीने दिपक सिमंत पेढेवाले आदी प्रमुख सहभागी झाले होते.
याप्रसंगी उद्धव ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत घंटानाद करण्यात आला. भाजपाचे शहर सरचिटणीस व स्थानिक नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी या आंदोलनांचे आयोजन केले होते.














