- युवा नेते पांडाभाऊ साने यांचा पुढाकार; आ. लांडगेंकडून उपक्रमाचे कौतुक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९. ऑगस्ट. २०२०) :- महापालिका प्रशासनाने गणपती विसर्जनासाठी कोणतीही यंत्रणा उभी केलेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना गणपती विसर्जनाची सोया व्हावी या उद्देशाने युवा नेते पांडाभाऊ साने यांनी आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गणपती विसर्जन आपल्या दारी’ या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमास गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाचे उदघाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमाबद्दल बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले, कोरोना महामारीमध्ये नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. नागरिकांच्या सोईसाठी भोसरी मतदारसंघातील माझ्या कार्यकर्त्यांनी ‘गणपती विसर्जन आपल्या दारी’ ही संकल्पना राबविली आहे. गणेश भक्ताच्या भावनेचा आणि सुरक्षेचा विचार या संकल्पनेतून केला आहे. पांडाभाऊ साने यांच्याकडून सतत चिखलीतील नागरिकांसाठी अभिनव उपक्रम सुरू असतात. या उपक्रमासाठी पांडाभाऊ साने यांच्या मित्र परिवराचे मोलाचे योगदान आहे. घरोघरी जाऊन गणेश विसर्जनाची सोय मित्र परिवरामूळे होते आहे, असेही त्यांनी सांगितले.
पांडाभाऊ साने म्हणाले, नागरिकांची कोरोना काळात सुरक्षा राखणे माझी जबाबदारी आहे. नागरिकांना घराबाहेर न पड़ता आपल्या लाडक्या बाप्पांचे विसर्जन भक्तिभावाने आपल्या दारात करता यावे यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. नागरिकांनीही या उपक्रमाचा लाभ घेऊन प्रशासनाच्या नियमांचा आदर करावा, असे आवाहन पांडभाऊ यांनी केले आहे.














