न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९. ऑगस्ट. २०२०) :- पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने उन्न ‘ती ‘चा गणपती महोत्सव साजरा करण्यात आला. उन्नती सोशल फाउंडेशन ने तुरटीपासून तयार केलेली गणेश मूर्ती बसवली होती. सातव्या दिवशी गणपतीची आरती कोरोना योद्धा महिला डॉकटरांच्या हस्ते करण्यात आली.
कोरोना संकटकाळात नियमांचे पालन करत उन्नती सोशल फाउंडेशन कार्यालयातील विसर्जन कुंडात फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे व महिलांच्या हस्ते गणेश विसर्जन करण्यात आले.
यावेळी फाउंडेशन चे संस्थापक संजय भिसे, अतुल पाटील, राजेंद्र जयस्वाल, राजू देवतारे, डॉ ओंकार बाबेल व महिलांमध्ये अश्विनी भिसे, कविता भिसे, डॉ प्राजक्ता अरमरकर, मीनाक्षी देवतारे, शोभा राजगुरे, सुनीता जयस्वाल, किरंजित कौर उपस्थित होत्या.
कुंदा भिसे म्हणाल्या, आपण देखील पर्यावरनाची काळजी घेत शाडू किंवा तुरटीपासून तयार केलेल्या गणेश मुर्त्या घ्याव्यात व सध्या कोरोनाच्या संकट काळात नियमांचे पालन करत गणेश मूर्ती घरीच विसर्जन करावी.














