न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. २९ ऑगस्ट) रोजी ११४४ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात चिखली (पुरुष ४८ वर्षे, पुरुष ४० वर्षे, पुरुष ८० वर्षे), पिंपरी (स्त्री ६४ वर्ष), पिंपळे गुरव (स्त्री ८० वर्ष), खराळवाडी (स्त्री ७० वर्षे, पुरुष ७२ वर्षे), निगडी (पुरुष ७८ वर्षे), भोसरी (पुरुष ८८ वर्षे, पुरुष ८० वर्षे), अहमदनगर (पुरुष ४१ वर्षे), चाकण (पुरुष ३३ वर्ष), येलवाडी ( स्त्री ५६ वर्ष), बालेवाडी (पुरुष ६८ वर्षे येथील रुग्णांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ४७६६० वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील एकूण ८६२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३३२७२ वर पोहोचली आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.














