- शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या पोहोचली ४८७३७ वर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑगस्ट २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज रविवारी (दि. ३० ऑगस्ट) रोजी १०७७ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात भोसरी (पुरूष वय ६५), भोसरी (पुरूष वय ६५), भोसरी (पुरूष वय ७६), भोसरी (पुरूष वय ७९), सांगवी (पुरूष वय ७६), नेहरूनगर (पुरूष वय ४३), पिंपरी (पुरूष वय ३९), पिंपरी (पुरूष वय २९), वाकड (पुरूष वय ७६), मोशी (पुरूष वय ६४), मोशी (पुरूष वय ७४), आंबेगाव (पुरूष वय ६५), आंबेगाव (पुरूष वय ६५), खेड (पुरूष वय ६५), (स्त्री वय ६८) देहूरोड, (स्त्री वय ४६) बिजलीनगर, (स्त्री वय ६२) आळंदीरोड येथील रुग्णांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ४८७३७ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील एकूण ८५४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३३८७३ वर पोहोचली आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.














