न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१. ऑगस्ट. २०२०) :- ज्योतिबा कामगार कल्याण मित्र मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव हे मंडळ गेली ३६ वर्षे काळेवाडी परिसरामध्ये विविध सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहे. मंडळाने यावर्षीचा गणेशोत्सव अगदी साधेपणाने मंदिरातच गणेशाची स्थापना करून साजरा केला.
ज्योतिबा कामगार कल्याण मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव तर्फे ज्ञानदीप बालकाश्रम, दिघी या अनाथ मुलांचे संगोपन करणाऱ्या संस्थेस मुलांना लागणाऱ्या दैनंदिन वस्तू व किराणा स्वरूपात मदत देण्यात आली. या छोट्याशा मदतीतून मंडळाने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.
याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष नितीन खेडकर, उपाध्यक्ष प्रदीप मोरे, विजय बगाडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. अशी माहिती ज्योतिबा कामगार कल्याण मित्र मंडळ, गणेश उत्सव कमिटीच्या वतीने देण्यात आली.














