न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१. ऑगस्ट. २०२०) :- सेवानिवृत्त कर्मचा-यांनी आपल्या प्रदीर्घ सेवेच्या अनुभवाचा उपयोग सध्या काम करणार्या कर्मचार्यांना मार्गदर्शन करण्यासाठी करावा. असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले. माहे ऑगस्ट २०२० मध्ये सेवानिवृत्त झालेल्या १४ कर्मचा-यांचा सत्कार समारंभ आज स्थायी सभागृहात आयोजित करण्यात त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, सुप्रिया जाधव, बाळासाहेब कापसे, योगेश वंजारे, नवनाथ शिंदे, ज्ञानेश्वर थोरवे, अमित जाधव उपस्थित होते.
आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त सत्कार झालेल्यांमध्ये प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, भांडारपाल रविंद्र सिंदकर, संभाजी गावडे, मुख्य लिपिक मछिंद्र कुंभार, दिलीप नेमाडे, ए.एन.एम. साधना चव्हाण, सहाय्यक उदद्यान अधीक्षक शरद बगाडे, उपशिक्षिका सीता पांढरे, मजूर महादेव लोंढे, रखवालदार बाळू शिंदे, साईदास जगताप, मुकादम महादेव पवार यांचा समावेश होता. तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या उपशिक्षिका स्मिता कोठावळे आणि सफाई कामगार शकुंतला विटकर यांचा देखील करण्यात आला.














