- आज ५९३ जणांना कोरोनाची बाधा तर, १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. ३१ ऑगस्ट) रोजी ५९३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात मोशी (पुरुष ६५ वर्षे), चिंचवड (स्त्री ६५ वर्षे), चिखली (पुरुष ६३ वर्षे, स्त्री ३५ वर्षे), थेरगाव (पुरुष ७४ वर्ष), भोसरी (स्त्री ६४ वर्षे, पुरुष ४६ वर्षे, पुरुष ४३ वर्षे), रहाटणी (पुरुष ६३ वर्षे, स्त्री २५ वर्षे), रावेत (स्त्री ३३ वर्षे), संभाजीनगर (पुरुष ६४ वर्षे), खेड (पुरुष ७५ वर्षे) येथील रुग्णांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ४९३३० वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील एकूण ८६६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३४८४२ वर पोहोचली आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.














