न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे, सेक्टर क्र. २३ निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा विषयक व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करणे व शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक आहे.
त्यामुळे गुरुवार दि. ०३/० ९/२०२० रोजी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. दि. ०३/०९/२०२० रोजी म.न.पा. मार्फत होणारा सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल.
त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. दुरुस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवलेमुळे शहरातील सर्व भागात दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवार दि. ०४/०९/२०२० रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी म.न.पा. कडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करुन म.न.पा.स सहकार्य करावे, असे पालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.














