न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१. सप्टेंबर. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. ०१ सप्टेंबर) रोजी ९६६ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात भोसरी (पुरुष ८१ वर्षे), पिंपळे गुरव (स्त्री ६३ वर्षे, पुरुष ७६ वर्षे), निगडी (पुरुष ५९ वर्षे), चिखली (पुरुष ४५ वर्षे), मोशी (पुरुष ३५ वर्षे), डुडूळगाव (पुरुष ६३ वर्षे), सांगवी (पुरुष ७० वर्षे), राजगुरूनगर (पुरुष ६८ वर्षे), आंबेगाव (स्त्री ५३ वर्षे), खेड (पुरुष ७५ वर्षे), रांजणगाव (पुरुष ५७ वर्षे), देहुरोड (पुरुष ७० वर्षे) येथील रुग्णांचा समावेश आहे. दिनांक ३१.८.२०२० रोजी पिं.चि.मनपा हद्दीताल मृत रुग्णांची संख्या ८६६ कळविण्यात आलेली आहे. परंतू त्यामधील ०७ दुबार नावे वगळण्यात आलेली असल्याने पिं.चि.मनपा हद्दीताल मृत रुग्णांची यादी व संख्या ८६७ निश्चित करण्यात आलेली आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ५०२९६ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३७३८७ वर पोहोचली आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.














