न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. सप्टेंबर. २०२०) :- बोपखेलमधील गणेशनगर येथील शिवकुमार लष्करातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचे घर २९ ऑगस्ट रोजी पहाटे पावणे पाच ते ३१ ऑगस्ट रोजी सकाळी बारा वाजताच्या दरम्यान कुलूप लाऊन बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला.
घरातील वेगवेगळ्या तीन बेडरूम मधील लोखंडी कपाटे उचकटून एकूण ३५ हजार रुपयांची रोकड, ३५ हजार ३१ रुपयांचे सोन्याचे टीका, १२ हजार ४९२ रुपयांचे सोन्याचे ब्रेसलेट, १२ हजार ९७१ रुपयांचे सोन्याची साखळी, दोन हजार ९६९ रुपयांची सोन्याची चकती, ५ हजार ९०० रुपयांची सोन्याची नथ, २० हजारांची सहा घड्याळे असा एकूण एक लाख २४ हजार ३६३ रुपयांचा ऐवज चोरून नेला.
शिवकुमार कामलेश्वरी झा (वय ५८, रा. गणेशनगर, बोपखेल) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.














