- पालिका सीसीसी सेंटर बंद करण्याच्या प्रयत्नात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. सप्टेंबर. २०२०) : पिंपरी चिंचवड महापालिकेने कोविड केअर सेंटरसाठी महाविद्यालयांच्या इमारती, हॉस्टेल ताब्यात घेतल्या आहेत. सरकारकडून शाळा सुरु करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे टप्प्या-टप्याने शहरातील महाविद्यालयातील हॉस्टेलमधील सीसीसी सेंटर बंद केले जाणार आहेत. या सेंटरमध्ये कोरोना पॉझिटीव्ह असणाऱ्या परंतु काहीच लक्षणे नसणाऱ्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
यात ताथवडेतील बालाजी लॉ कॉलेज, पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, रावेतमधील डी. वाय. पाटील मुलींचे, मोशीतील आदिवासी विभाग मुलांचे व मुलींच्या हॉस्टेलमध्ये ‘सीसीसी’ सेंटर सुरु केले आहे. पालिकेने शहराच्या विविध भागातील ११ ठिकाणी ‘कोविड केअर सेंटर’ (सीसीसी) उभारले होते.
दरम्यान महापालिकेने शासनाच्या माध्यमातून शहरातील विविध भागात जम्बो रुग्णालय व कोविड केंद्रांची उभारणी केली आहे. तसेच या महिन्याच्या अखेरीस शासनाचा शाळा, महाविद्यालये सुरु करण्याबाबतचा मानस आहे. रुग्णसंख्या देखील आटोक्यात येईल. त्यामुळे शहरातील महाविद्यालयातील हॉस्टेलमधील सीसीसी सेंटर बंद करणार असल्याची माहिती पालिका आयुक्त हर्डीकर यांनी दिली.














