न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर. २०२०) :- काळेवाडी परिसरात दहशत पसरविणाऱ्या चौघांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम ( मोका ) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी बुधवारी (दि. २) आदेश दिले.
सचिन सोनू साठे (२६, रा. काळेवाडी, वाकड, पुणे), किशोर ज्ञानदेव शेलार (२५, रा. लिंक रोड, चिंचवड), सीजीन फिलोप जॉर्ज, (२६, रा. काळेवाडी, वाकड) , रोहीत लल्लन सिंग (२२, रा. वाकड) अशी कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी टोळी तयार करून परिसरात दहशत पसरवीत होते. आरोपींनी ५ जूनला पूर्ववैमनस्यातून एकाचा खून केला होता. त्यामुळे वाकड पोलिसांनी त्यांच्या विरोधात मोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे पाठवला होता. अपर आयुक्त पोकळे यांनी या प्रस्तावास मंजुरी देत आरोपींवर मोकाचे आदेश दिले आहेत.















