न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. सप्टेंबर. २०२०) :- चिखलीतील नेवाळे वस्ती परिसरात अनधिकृतपणे मोठ्या गॅस सिलिंडरमधून छोट्या गॅस सिलिंडरमध्ये रिफिलिंग करून देत असताना गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास अचानक गॅसने पेट घेतला.
गॅस सिलिंडरने पेट घेतल्याची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत नागरिकांनी पेटलेला गॅस विझवला. अग्निशामक दलाने घटनास्थळावरून पाच मोठे तर १७ छोटे गॅस सिलिंडर जप्त केले व चिखली पोलिसांच्या ताब्यात दिले.
ललित दुर्गाराम चौधरी (वय ४०, नेवाळेवस्ती, चिखली) यांच्यासह आणखी एकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक राजेंद्र केदार यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत .














