न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. सप्टेंबर. २०२०) :- किवळे परिसरातील एका तरुणीला आरोपीने लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी जवळीक साधली. तसेच तिचे टॉपलेस फोटो घरच्यांना पाठविण्याची धमकी दिली.
यावेळी आरोपीने तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच तिच्या हातावर, पायावर अगरबत्तीचे चटके दिले. इतकेच नव्हे तर तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून शिवीगाळ व मारहाण केली.
एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी तरुणावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. वाकड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.














