न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. सप्टेंबर. २०२०) :- कंगना राणावत हीने मुंबई पाकव्याप्त काश्मीर सारखी असल्याचे भाष्य केले. त्या विरोधात शिवसेना भोसरी विधानसभेच्या वतीने शिवसेना नेते तथा माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या भोसरी येथील कार्यालयासमोर आज शुक्रवारी सायं ६:०० वाजता निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसेनेच्या सुलभा उबाळे, इरफान सय्यद, माउली कटके, धनंजय अल्हाट, निलेश मुटके, रावसाहेब थोरात, तुषार सहाणे, अनिल सोमवंशी, राहुल गवळी, काळेताई, आशा भालेकर, दादा नरळे, राहुल भोसले तसेच शिवसैनिक, सर्व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी कंगना राणावत हीच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.














