न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. सप्टेंबर. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शुक्रवारी (दि. ०४ सप्टेंबर) रोजी १००५ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा २४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ६४५ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यात चिंचवड (पुरुष ५२ वर्षे), भोसरी (पुरुष ४५ वर्ष, स्त्री ६१ वर्षे), बौध्दनगर (पुरुष ५५ वर्षे), काळेवाडी (पुरुष ७० वर्षे, पुरुष ७० वर्षे), गांधीनगर (पुरुष ४० वर्षे), रावेत (पुरुष ६८ वर्षे), प्राधिकरण (पुरुष ८५ वर्षे), यमुनानगर (पुरुष ७३ वर्षे), वाकड (पुरुष ६९ वर्षे), चिखली (स्त्री ५८ वर्षे), रहाटणी (पुरुष ६५ वर्षे), पिंपळे सौदागर (स्त्री ८५ वर्षे), वाकड (पुरुष ६१ वर्षे), पिंपरी (स्त्री ५० वर्षे), निगडी (स्त्री ४८ वर्षे), थेरगांव (स्त्री ५६ वर्षे), येरवडा (पुरुष ७३ वर्षे), कोल्हापूर (पुरुष ६० वर्षे), मुळशी (पुरुष ५५ वर्षे), बिबवेवाडी (पुरुष ८५ वर्षे), चाकण (पुरुष ५० वर्षे), दौंड (पुरुष ८० वर्षे) येथील रुग्णांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ५३२८९ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४२३४९ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ९०९ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.














