न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. सप्टेंबर. २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुक सुरक्षित व सुरळीतपणे होण्याकरीता यापूर्वीचे काही निर्बंध रद्द करण्यात आले असून दिघी आळंदी वाहतुक विभाग हद्दीतील प्रभाग क्रमांक ४ मधील गणेशनगर मुख्य रस्त्यावर वाहतुक कोंडी होत असल्याने बोपखेल मधील गणेशनगर येथील हनुमान मंदीर या मुख्य रस्त्यावर सम-विषम तारखेस पार्किंगबाबतचे तात्पुरत्या स्वरुपात आदेश देण्यात आले आहेत.
या बदलाबाबत नागरिकांच्या काही सूचना असल्यास त्या पोलीस उपआयुक्त, वाहतुक शाखा, पिंपरी-चिंचवड यांच्या कार्यालयात ५ सप्टेंबर २०२० ते १९ सप्टेंबर २०२० पर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात, नागरिकांच्या सूचना व हरकतींचा विचार करुन अंतिम आदेश काढण्यात येणार आहे. अग्निशमन, पोलीस आणि रुग्णवाहिका या अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त सुधीर हिरेमठ प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे.














