न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. सप्टेंबर. २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा दि. ०४/०९/२०२० रोजी रात्री ११.०० वाजता MSEDCL फिडर नादुरुस्त झाल्याने रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत पुरवठा खंडित होऊन संपूर्ण पंपिंग बंद झाले आहे.
त्यामुळे शहरातील आजचा म्हणजेच शनिवार दि. ५ सप्टेंबर २०२० रोजीचा दिवसभराचा तसेच उद्या, रविवार दि.६ सप्टेंबर २०२० रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत राहील.
MSEDCL मार्फत दुरुस्तीचे काम सुरु असून विद्युत पुरवठा पूर्ववत झाल्यावर पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचा विभागाचा प्रयत्न राहील. तरी, नागरिकांनी याची नोंद घेऊन उपलब्ध पाणी जपून वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे पालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.














