न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. सप्टेंबर. २०२०) :- काळेवाडीतील शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित, श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय व एलबीटी इंग्लिश मिडीअम स्कूल यांच्या संयुक्त विदयमाने आज शनिवारी शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र तापकीर (मा. विरोधी पक्षनेते पिं. चिं. मनपा) यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. सतिश घरत (संचालक-शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ) हे होते.
यावेळी सामा. कार्यकर्ते देवराम थोरात, सौ. अनिताताई तापकीर (मा. नगरसेविका पिं चिं मनपा), संस्थेचे सचिव सागर तापकीर, संचालक राजू पवार, मुख्याध्यापक शशिकांत वाखारे सर व मुख्या. रेणू वर्मा आदी उपस्थित होते.














