न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. सप्टेंबर. २०२०) :- कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघटनेतर्फे शिक्षक दिनानिमित्त (दि. ५) काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात येणार आहे.
तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे. मूल्यांकनास पात्र घोषित, अघोषित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वेतन अनुदान द्यावे. २००२-२००३ पासून वाढीव पदावर कार्यरत असलेल्या शिक्षकांना वेतन मंजुरी व वेतन अनुदान द्यावे. दहा वर्षापासून विनावेतन व अत्यल्प वेतनावर कार्यरत शिक्षकांना वेतन अनुदान द्यावे, अशी माहिती शिक्षक महासंघाचे सरचिटणीस संतोष फासगे यांनी दिली.














