न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. सप्टेंबर. २०२०) :- शहराचे नवे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी (दि. ५) दुपारी संदीप बिष्णोई यांच्याकडून पदभार स्वीकारला. पिंपरी – चिंचवड आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर दोन वर्षांत शहराला लाभलेले ते तिसरे पोलीस आयुक्त आहेत.
कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी आयुक्तालयात हजर होत बिष्णोई यांच्याकडून पदभार स्वीकारला. मुदतपूर्व बदली झाली म्हणून, बिष्णोई केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकीकरणकडे धाव घेणार असल्याची चर्चा होती.
तसेच त्याबाबतचा सही नसलेला एक ‘ ड्राफ्ट देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आपण केंटकडे जाणार नसून, शासन देईल ती जबाबदारी सांभाळणार आहोत असे बिष्णोई यांनी सांगितले.














