न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. सप्टेंबर. २०२०) :- इंद्रायणीनगरच्या राधाकृष्ण चौकात दुपारी दीडच्या सुमारास विद्युत डीपीचा स्फोट झाला. यामध्ये डीपीला आग लागली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी पंचवीस मिनिटात या आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत चार महिन्याच्या बालकासह दोन महिला जखमी झाल्या. जखमी झालेल्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.














