- आज साडेसातशेच्या वर रुग्ण कोरोनामुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. सप्टेंबर. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. ०५ सप्टेंबर) रोजी ९४१ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा २४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ७५९ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यात पुनावळे (पुरुष ७५ वर्षे), काळेवाडी (पुरुष ५६ वर्षे), चोविसावाडी (पुरुष ९३ वर्षे), मोशी (स्त्री ६४ वर्षे, पुरुष ६३ वर्षे), चिंचवड (पुरुष ७८ वर्षे, पुरुष ६३ वर्षे), च-होली (पुरुष ५२ वर्षे, पुरुष ६३ वर्षे), वाकड (पुरुष ७० वर्षे), दिघी (स्त्री ७५ वर्षे), दापोडी (स्त्री ६७ वर्षे), पिंपळे गुरव (पुरुष ६३ वर्षे), खेड (पुरुष ४६ वर्षे, पुरुष ६५ वर्षे), इंदापुर (स्त्री ५० वर्षे), सुदउंबरे (पुरुष ४४ वर्षे), अहमदनगर (पुरुष ६० वर्षे), मावळ (पुरुष ७५ वर्षे), पुरंदर (पुरुष ८२ वर्षे), चाकण (पुरुष ५४ वर्षे, पुरुष ५५ वर्षे), खडकी (पुरुष ४० वर्षे) येथील रुग्णांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ५४२३० वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४५४९६ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ९२३ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.














