न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६. सप्टेंबर. २०२०) :- शिवसेनेचे श्रद्धास्थान असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. दुबईवरुन मातोश्रीवर चार फोन आल्याची बातमी समोर आली आहे. यानंतर मातोश्रीची सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
यानंतर आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी या घटनेची माहिती घेतली असून पुढील सुचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान याआधीही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांना धमक्या देण्यात आलेल्या आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनासुद्धा अशाप्रकारे धमक्या देण्यात आल्या होत्या.
मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्याने हे शहर अतिशय संवेदनशील मानले जाते. कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम देशाबाहेर राहुन मुंबईतील त्याचे अवैध धंदे चालवत असतो. पण आता पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरेंच्या काळात अशी धमकी आल्याने खळबळ उडाली आहे.














