न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ सप्टेंबर २०२०) :- खोपोलीमधील तेलाची कंपनी फ्रिगोरिफीको अलाना प्रा. लि या कंपनीमधून २० टन वजनाचे तेलाचे डबे फिर्यादीने आरोपीच्या ट्रकमध्ये भरून दिले. भोसरी परिसरात आरोपीने एक लाख ६८ हजार रुपये किमतीचे १ हजार ६८० किलो वजनाचे ११२ तेलाचे डबे परस्पर चोरी करून विकले.
मनोजकुमार काकासाहेब शिंदे (वय ३४, रा. भेकराईनगर, हडपसर) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ट्रक चालक सुरेश प्रकाश राजोळे (वय २५, रा. लक्ष्मीनगर, दिघी. मूळ रा. पिरुपटेल वाडी, ता. निलंगा, जि. लातूर) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार १५ ते १७ जुलै दरम्यान भोसरी परिसरात घडला. याबाबत ५ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, भोसरी पोलीस तपास करीत आहेत.