न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते सुभाष जाधव, रोहीदास मदने, शांताराम गोफणे, दिपाताई तटले, अनंत चव्हाण, विजयराव घनवटे, शेखर गोरगले, सुरेश चव्हाण उपस्थित होते.