- आज गुरुवारी १२१९ जणांना बाधा; १९ जणांचा बळी; पाचशेच्यावर रुग्ण कोरोनामुक्त…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. १० सप्टेंबर) रोजी १२१९ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ५५७ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यात पिंपरी (पुरुष ८३ वर्षे), आळंदी रोड (पुरुष ७४ वर्षे), वाल्हेकरवाडी (पुरुष ७० वर्षे), भोसरी (पुरुष ४२ वर्षे), रुपीनगर ( पुरुष ७० वर्षे ) नेहरुनगर ( पुरुष ५ ९ वर्षे ) चिंचवड ( पुरुष ९ ० वर्षे ) निगडी ( पुरुष ७८ वर्षे ) वाकड ( पुरुष ४५ वर्षे , स्त्री ७४ वर्षे ) रहाटणी ( स्त्री ६५ वर्षे ) कासारवाडी ( पुरुष ५५ वर्षे ) , दिघी ( स्त्री ६५ वर्षे , पुरुष ८७ वर्षे ) खेड ( स्त्री ६४ वर्षे , स्त्री ४८ वर्षे , पुरुष ६० वर्षे ) लोणावळा ( स्त्री ६५ वर्षे , पुरुष ३८ वर्षे ) येथील रुग्णांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ५९९६६ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४८६५१ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ९८० जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.


















