- सुःखद… एक्कावन्न हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी केली कोरोनावर मात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. १२ सप्टेंबर) रोजी १३६३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा ३५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १५२७ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यात यमुनानगर, निगडी (पुरुष ५२ वर्षे), भोसरी (पुरुष ५७ वर्षे, पुरुष ६३ वर्षे, पुरुष ५२ वर्षे), चिंचवड ( स्त्री ४५ वर्षे, पुरुष ६७ वर्षे, स्त्री ६४ वर्षे), खराळवाडी (पुरुष ३४ वर्षे), चिखली (पुरुष ४० वर्षे, पुरुष ७० वर्षे), आकुर्डी (पुरुष ८० वर्षे), रहाटणी (पुरुष ७७ वर्षे), दिघी (पुरुष ६५ वर्षे), च-होली (पुरुष ७७ वर्षे), वाकड ( स्त्री ७१ वर्षे), काळेवाडी (पुरुष ४० वर्षे), सांगवी ( स्त्री ५९ वर्षे), थेरगाव (स्त्री ६२ वर्षे), भोर (पुरुष ४७ वर्षे), देहुगाव (पुरुष ६४ वर्षे), येरवडा (पुरुष ५० वर्षे, पुरुष ५९ वर्षे, स्त्री ६६ वर्षे), हडपसर (पुरुष ५६ वर्षे), इंदापुर (पुरुष ७९ वर्षे), पुणे (पुरुष ५२ वर्षे, पुरुष ९० वर्षे), जुन्नर (स्त्री ८० वर्षे), नांनगलवाडी (पुरुष ५५ वर्षे), खेड (स्त्री ६० वर्षे, स्त्री ५० वर्षे), कसबापेठ पुणे (पुरुष ५४ वर्षे), खारपुडी बु. (स्त्री ८० वर्षे), शिवणे (पुरुष ३६ वर्षे), धानोरी (पुरुष ६६ वर्षे) येथील रुग्णांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ६२५९४ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५१४५० वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १०२६ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.


















