न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात रविवारी (दि. १३ सप्टेंबर) रोजी १०२८ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा ३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १६८६ जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यात चिखली (पुरुष ६५ वर्षे, पुरुष ३५ वर्षे), आकुर्डी (पुरुष ६४ वर्षे), भोसरी (पुरुष ६६ वर्षे, पुरुष ६९वर्षे, स्त्री ५४ वर्षे), पिंपळे गुरव (पुरुष ६९ वर्षे), चिंचवड (पुरुष ६७ वर्षे), रहाटणी (पुरुष ५० वर्षे), निगडी (स्त्री ५४ वर्षे, पुरुष ६९ वर्षे), दिघी (पुरुष ५७ वर्षे), आंबेगांव (पुरुष ७० वर्षे, पुरुष ५४ वर्षे, पुरुष ६८ वर्षे), सातारा (पुरुष ६६ वर्षे, पुरुष ४७ वर्षे), पुणे (पुरुष ४५ वर्षे, पुरुष ४७ वर्षे, स्त्री ६५ वर्षे), खेड (पुरुष ७० वर्षे, पुरुष ६९ वर्षे), जुन्नर (स्त्री ६८ वर्ष), अहमदनगर (पुरुष ८१ वर्षे, (स्त्री ६० वर्षे), मावळ (पुरुष ६५ वर्षे), वाघोली (पुरुष ७५ वर्षे), धनकवडी (पुरुष ५८ वर्षे), कौसे (पुरुष ३५ वर्षे), रावेत (स्त्री ८२ वर्षे) येथील रुग्णांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ६३६२२ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५३१३२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १०३९ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.


















