न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२०) :- पिंपरीतील मोरवाडी कोर्ट परिसरात पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते नुकतेच ‘अण्णासाहेब बनसोडे सोशल फाऊंडेशन’ चे उदघाटन करण्यात आले.
यावेळी शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजोग वाघरे, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, युवा नेतृत्व सिद्धार्थ अण्णा बनसोडे, फाऊंडेशनचे अध्यक्ष सन्नीभाई डहाळे, उपाध्यक्ष अशोक अण्णा भडकुंभे, कार्याध्यक्ष निलेश निकाळजे, राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी आणि सनीभाऊ डहाळे युवा मंच मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.