न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ सप्टेंबर २०२०) :- देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपर चिंचवड शहर भा. ज. पा. पार्टीच्या वतीने “सेवा सप्ताह २०२०” मोहीम राबविली जात आहे.
या उपक्रमांतर्गत आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर उषाताई उर्फ माई ढोरे, नगरसेवक संतोष कांबळे, नगरसेविका शारदा सोनवणे, हर्षल ढोरे यांच्या वतीने सांगवी भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांना सॅनीटायझर, मास्क आणि हॅन्डग्लोजचे वाटप करण्यात आले. राही-माई प्रतिष्ठाण व जे.डी.ग्रुप तर्फे सांगवी भागातील म.न.पा. स्व. इदिरा गांधी रूग्णालयातीत डॉ. विजया आंबेडकर व सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय व आया सर्वानां “करोना योध्दा”सन्मानीत करण्यात आले.
यावेळी प्रमोद ठाकर, युवा नेते जवाहर ढोरे, सिनेट सदस्य संतोष ढोरे, शाहरूख सय्यद, गणेश काची, भुषण शिंदे, धनंजय ढोरे, कु. निलेश वाळुंज व मनपा आरोग्य अधिकारी व बुथ प्रमुख उपस्थितीत होते.













