- जलवाहिनीसाठी शहरातील नागरिकांनी ऐक तरी आंदोलन केले ?
- मावळवासियांचा पालिका प्रशासनाला उलट सवाल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२०) :- पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला आमचा विरोध कायम आहे, असे असताना पिपरी चिंचवड महापालिका किंवा राज्यशासन यांनी आमच्या भूमिकेशी खेळ करू नये, अन्यथा पुन्हा आंदोलन करुन जशाच तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांनी दिला.
गेले दोन दिवस पवना जलवाहिनीचे काम सुरु होणार असल्याचे वृत्त आले. त्यानंतर मंगळवारी सर्वपक्षीय नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
या प्रकल्पामुळे पवन मावळात मोठे नुकसान होणार आहे. त्यासाठी हा प्रकल्प रद्दच करावा. प्रकल्पाला कालही विरोध होता, आजही आहे. असे असताना महापालिकेने प्रकल्प सुरु करण्याच्या हालचाली चालू केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात तीव्र संतापाच्या भावना निर्माण झाल्या आहेत. सर्वपक्षीय संघटना व शेतकऱ्याबरोबर चर्चा न करता निर्णय घेतल्यास आंदोलन करण्यात येईल. बंदिस्त जलवाहिनी होण्यासाठी मावळवासीयांनी आंदोलन केले. जलवाहिनी व्हावी, यासाठी पिंपरी चिंचवडकरांनी एक तरी आंदोलन केले का? हे सगळे कारस्थान पंचतारांकित व्यक्तींचे आहे. तोच ठेकेदार पाण्याच्या आडून करोडो रुपये गिळण्यासाठी हे कारस्थान चालू आहे. हा प्रकल्प आम्ही कधीही होऊ देणार नाही.














