- पुण्यात १०० टन क्षमतेचा प्रकल्प उभारा; बेलसरे यांची सरकारकडे मागणी…
वान्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२०) :- शासनाने पुण्यात युद्ध पातळीवर ऑक्सिजन उत्पादनाचा किमान प्रतिदिन १०० टन क्षमतेचा प्रकल्प उभारावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी केली आहे. लघु उद्योग संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे.
बेलसरे यांनी त्यात म्हटले आहे की, ‘ राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ७ सप्टेंबरला अध्यादेश काढून ८० टक्के ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णालयांना व २० टक्के उद्योग क्षेत्राला करण्याचे आदेश दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २० रुपये प्रती घन मीटरने मिळणारा ऑक्सिजनचा सिलिंडर १४० रुपये प्रती घनमीटर झाला. काळ्या बाजारात आठशे ते हजार रुपये मोजून ऑक्सिजनचा सिलिंडर उद्योजकांना घ्यावा लागत आहे. दर दुप्पट, तिप्पट देऊनसुद्धा ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होत नाही. यावर शासकीय नियंत्रण नाही. सध्या ऑक्सिजनचा सिलिंडरवर अवलंबून असणारे उद्योग बंद करण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे. ऑक्सिजन सिलिंडरवरचा वाढता खर्च व अपुरा पुरवठा यामुळे उद्योग क्षेत्र अडचणीत आले आहे. या मुळे कामगारांवर पुन्हा बेकारीची कुऱ्हाड कोसळणार असून, शासनालाही जीएसटीच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न कमी होणार आहे.
पिंपरी – चिंचवड, चाकण, तळेगाव या उद्योगांच्या औद्योगिक परिसरात सुमारे ३५ हजार सूक्ष्म, लघु, मध्यम व मोठे उद्योग आहेत. रुग्णांची संख्या वाढली, तर उर्वरित २० टक्के ऑक्सिजनसुद्धा कमी पडेल. त्यामुळे सध्या ऑक्सिजन सिलिंडरवर अवलंबून असणारे उद्योग बंद करण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे. ऑक्सिजन सिलिंडरवरचा वाढता खर्च व अपुरा पुरवठा यामुळे उद्योग क्षेत्र अडचणीत आले आहे. या मुळे कामगारांवर पुन्हा बेकारीची कुऱ्हाड कोसळणार असून, शासनालाही जीएसटीच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न कमी होणार आहे.
कोरोना रुग्णांना प्राधान्याने ऑक्सिजनचा पुरवठा व्हायला हवा. शासनाने पुण्यात प्रती दिन शंभर टनापेक्षा जास्त ऑक्सिजनचे उत्पादन व पुरवठा करणारी यंत्रणा युद्ध पातळीवर उभारावी. त्यासाठी सव्वाशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प मंजूर करुन सुरु करावा.
– संदीप बेलसर, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटना.