न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२०) :- पुढचे ३ महिने आव्हानात्मक असू शकतात, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. थंडीमध्ये कोरोना आणखी घातक होऊ शकतो, इतकेच नाही तर देशात सण सुरू होत आहेत, त्यामुळे संक्रमण आणखी जलद वाढू शकतं, अशी भीती आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली आहे.
त्यामुळे आज (२३ सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्वाची बैठक घेणार आहेत. देशाच्या ७ राज्यांमध्ये कोरोना जास्त प्रमाणात वाढत आहे. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामीळनाडू, पंजाब आणि दिल्लीचा समावेश आहे.
कोरोना संक्रमण अधिक असणाऱ्या या राज्यांसाठी काय पावलं उचलायची? याचे निर्देशही केंद्र सरकार देऊ शकतं. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील उपस्थित असणार आहेत.












