- आज बुधवारी ८३५ जणांना कोरोनाची बाधा तर, १६ जणांचा मृत्य; ५५७ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. २३ सप्टेंबर) रोजी ८३५ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ५५७ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे पिंपळे गुरव (पुरुष ८४ वर्षे), काळेवाडी (पुरुष ५१ वर्षे, स्त्री ६९ वर्षे, पुरुष ७० वर्षे), देहुरोड (पुरुष ६४ वर्षे), आकुर्डी (पुरुष ६४ वर्षे, स्त्री २३ वर्षे), चिखली (स्त्री ६५ वर्षे, पुरुष ८१ वर्षे), पिंपळे सौदागर (पुरुष ५४ वर्षे), चिंचवड (पुरुष ७२ वर्षे), वाकड (पुरुष ४० वर्षे), रहाटणी (पुरुष ७५ वर्षे), संत तुकारामनग पिंपरी (पुरुष ४७ वर्षे), पिंपरी (पुरुष ७२ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेला रुग्ण हे आळंदी (पुरुष ४३ वर्षे) येथील रहिवासी आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ७२४७६ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ६२५५२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ११९० जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.


















