- पालिकेच्या गुणवंत विद्यार्थी बक्षीस योजनेसह शहरातील २०५ कोटींच्या कामास स्थायीची मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२०) :- भामा आसखेड धरणातील जॅकवेलपासुन नवलाख उंबरे पर्यंत पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनी टाकणेच्या कामासाठी येणा-या ६१ कोटी तर नवलाख उंबरे पासुन देहु बंधा-यापर्यंत जलवाहिनी टाकण्यासाठी येणा-या २०५ कोटी रुपये खर्चासह विविध विकास कामांच्या खर्चास आज स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते.
मनपाच्या विविध विभागांसाठी आवश्यक १४० संगणक संच खरेदीकामी येणा-या सुमारे ५२ लाख ८ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. मनपाच्या क , ड , ई व ह प्रभागातील मैलाशुध्दीकरण केंद्रे व मैलापाणी पंप हाऊसचे इमारतीवर उर्जा निमितीकामी सोलर सिस्टीम बसविणे व अनुषंगीक कामे करणेकामी येणा – या सुमारे ६६ लाख ९६ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
शालांत परीक्षा मार्च २०२० पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक विद्यालयातील इ.१० वी शालांत परीक्षेत ८० टक्के पेक्षा जास्त गुण संपादन करणा-या गुणवंत विद्यार्थ्यांना व दिव्यांग विद्यर्थ्यांना बक्षीस रक्कम अदा करणेकामी येणा-या सुमारे १ कोटी ५ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. २४ मधील भिंगारे कॉर्नर ते रवदिप कॉलनी ( वाकड रोड ) रस्त्याचे कॉक्रटीकरण करणेकामी येणा-या सुमारे ६ कोटी ५६ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. पिंपरीमधील साई चौक परिसर, बलदेवनगर, कैलासनगर व इतर परिसरातील जल:निसारण अवस्था सुधारणा कामे करणेकामी येणा-या सुमारे ७१ लाख ७८ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. कासारवाडी मैलाशुध्दीकरण केंद्रांतर्गत प्रभाग क्र. ८ मधील लांडगेनगर, राजवाडा परिसर, महाराष्ट्र कॉलनी व उर्वरीत भागात आवश्यकतेनुसार नविन ड्रेनेज लाईन टाकणेकामी येणा-या सुमारे २७ लाख ७७ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.


















