- उच्च न्यायालयाचे महापालिकेस निर्देश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ सप्टेंबर २०२०) :- महापालिका शिक्षण समितीतील शालेय खरेदीप्रकरणी ई – निविदा प्रणाली राबवू नये आणि जर निविदा प्रक्रिया राबविली असेल तर ती रद्द करावी असे निर्देश उच्च न्यायालयाने महापालिकेस दिले आहेत. तसेच याप्रकरणी तातडीने राज्य सरकारने अहवाल सादर करावा, असे आदेशही दिले आहे.
शिक्षण समितीच्या वतीने शालेय साहित्य खरेदी केली जाते. थेटपणे खरेदीचा आग्रह सत्ताधाऱ्यांचा असतो. मागील महिन्यात आरोप झाल्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी साहित्य खरेदीचा विषय मागे घेतले होते. तसेच, ई – निविदा प्रक्रिया राबवावी अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर याप्रकरणी साहित्य पुरवठा करणाऱ्या संस्थांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, राज्य सरकार आणि महापालिकेला प्रतिवादी केले होते.
साहित्य पुरवठादार संस्थांनी आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर न्यायालयाने एका आठवड्यात अहवाल सादर करावा. तसेच, ई निविदा प्रक्रिया राबवू नये असे आदेश दिले आहेत.