न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. ०१ डिसें. ) :- चिखली परिसरातून कुदळवाडीमार्गे जाणाऱ्या सकाळची बसची फेरी ही गेल्या काही दिवसांपासून बंद केली असल्यामुळे कुदळवाडीतील नागरिकांना नाहक मनस्ताप होत आहे. कुदळवाडीतून पिंपरी चिंचवड शहरात नोकरी-व्यवसायास जाणाऱ्या नागरिकांची यामुळे तारांबळ उडाली असून, मनपाच्या बसची फेरी बंद झाल्यामुळे खाजगी वाहन चालकांची मात्र चंगळ होत आहे.
याची दखल घेत स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असून, तात्काळ चिखली परिसरातून कुदळवाडीमार्गे जाणाऱ्या बसची फेरी सुरु करण्याबाबत अधिकाऱ्यांशी बोलणी केली व त्यांना मागणीचे निवेदन दिले आहे. यावेळी लवकरच बसची फेरी पूर्वरत सुरु करण्याचे आश्वासन यावेळी दिनेश यादव यांना अधिकाऱ्यांनी दिले.















