न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी-चिंचवडमध्ये नगरसेवकांचे कोरोनामुळे निधन होण्याचे सत्र सुरूच आहे. प्रभाग क्रमांक ४ चे भाजप नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचं चिंचवडमधील खासगी रुग्णालयात कोरोना उपचारादरम्यान आज शनिवारी दुःखद निधन झाले आहे. त्यांना महिनाभरापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना मधुमेहाची लागण झाली होती.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे करोनामुळे निधन झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख याचं कोरोनामुळे वयाच्या ५० व्या वर्षी निधन झाले. आता तिसरे नगरसेवक लक्ष्मण उंडे याचं कोरोनामुळे निधन झाले आहे.
उंडे हे २०१७ च्या पालिका निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर नगरसेवक पदी निवडून आले होते. त्यांनी स्थायी सदस्यपदावर देखील काम केले होते. त्यांच्या जाण्याने सत्ताधारी भाजपला झटका बसला आहे.