नवी दिल्ली : वृत्तसंस्था : जकार्ता येथे सुरु असलेल्या १८ व्या आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू पी .व्ही .सिंधू आणि सायना नेहवाल या दोघींनीही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आशियायी स्पर्धेत बॅडमिंटनच्या अंतिम स्पर्धेपर्यंत पोहोचणारी सिंधू ही पहिली भारतीय महिला ठरली आहे. तर कांस्य पदक मिळवत सायनानेही बॅडमिंटन एकेरीत ३६ वर्षांनी पदक जिंकून इतिहास रचला आहे. बॅडमिंटनच्या एकेरीत पदक मिळवणारी सायना पहिली भारतीय महिला ठरली आहे. आता सिंधू फायनल मध्ये देखील जिंकेल अशी आशा सर्व भारतीयांना लागली आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची पी.व्ही सिंधू अंतिम फेरीत तर सायनाला कांस्य.












