संपूर्ण राज्यात आता वातानुकूलित इलेक्ट्रिक बस धावणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इलेक्ट्रिक बसच्या प्रस्तावास तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. योग्य दराचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधित कंपनीला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. रामगिरी येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नागपूर शहरातील विविध प्रकल्प, विकासकामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.