न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२०) :- ‘नवऱ्याला सोडून दे आणि माझ्याशी लग्न कर,’ असे म्हणत वारंवार त्रास देणाऱ्या एका पन्नाशीतील गृहस्थास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मोहन मुरलीधर मुळे (वय ४९, रा. पिंपळे सौदागर) असे आरोपीचे नाव आहे. एका महिलेने या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, आरोपीवर स्त्री अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
मुळे हा संबंधित महिलेला फोन करून तू मला दररोज फोन करत जा. अन्यथा मी माझ्या कुटुंबासह आत्महत्या करेन. नाहीतर तुझ्या कुटुंबाला संपवून टाकेल. तू मला आवडतेस. तुझ्या नवऱ्याला सोडून दे आपण लग्न करू, असे तो फिर्यादीला म्हणत असे. संबंधित महिलेने नकार दिल्यानंतर त्याने महिलेला तू बाहेर फिरताना दिसल्यास मारून टाकण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
जानेवारी २०१९ पासून आरोपी त्रास देत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विवाहित महिलेला माझ्यासोबत लग्न कर म्हणून तगादा लावणाऱ्या पन्नाशीतील गृहस्थाविरोधात पीडित महिलेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तू मी माझ्यासोबत बोलत जा, नाहीतर मी आत्महत्या करेन अशी धमकी तो देत होता, असे फिर्यादीत म्हटले आहे.















