न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेच्या वतीने ‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ ही मोहीम शहरभर राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी १३४९ सर्वेक्षण पथके शहरात कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत आज अखेर एकूण ३ लाख एकोणपन्नास हजार कुटुंबांतील १० लाख ४५ हजार नागरिकांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.
पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, नागरिकही मनात कोणताही संकोच न ठेवता आपल्याबरोबरच आपल्या तो कुटुंबाची तपासणी करून घेत आहेत. तसेच प्रत्यक्ष गृहभेट देणाऱ्या महापालिकेच्या टीमला सहकार्यदेखील करीत आहेत. ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात मदत होत आहे.
शहराची एकूण लोकसंख्या २४ लाख ४ हजारांच्या जवळपास असून, या लोकसंख्येच्या ४३ टक्के म्हणजेच १० लाख ४५ हजार नागरिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. यामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सुरु आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची माहिती मिळणार आहे. किती नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला याची माहिती मिळणार आहे. – श्रावण हर्डीकर , आयुक्त















