न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९. सप्टेंबर २०२०) :- कोरोनाच्या युद्धात आपले पोलीस बांधव स्वतःचा जीव मुठीत घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. पोलीस बांधवांच्या ह्या लढाईत स्वतःचे रक्षण व्हावे ह्या उद्देशाने आज चिंचवडगाव पोलीस स्टेशन येथे रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांच्या वतीने मास्क आणि सॅनिटायझर याचे वाटप झाले.
हे वाटप वाल्हेकरवाडी पोलीस चौकी, चिंचवडगाव पोलीस चौकी आणि चिंचवडगाव पोलीस स्टेशन येथील सर्व पोलीस कर्मचारी आणि स्टाफ यांच्यासाठी वितरित करण्यात आले. तसेच रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी पवना स्वच्छता अभियान आणि इतर निसर्ग संवर्धन उपक्रमाची माहिती त्यांना देण्यात आली.
यावेळी चिंचवडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव तसेच गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक खुळे आणि रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे सेक्रेटरी सचिन खोले, प्रोजेक्ट समन्वयक गणेश बोरा, वसंत ढवळे, डॉक्टर मोहन पवार, रुपेश मुनोत आणि रामेश्वर पवार हे उपस्थित होते.















