न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९. सप्टेंबर २०२०) :- प्रभाग क्रमांक १५ मध्ये महाराष्ट्र प्रदेश, भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्ष अनुप अविनाश मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते मोफत ॲम्बुलन्स सेवेचे लोकार्पण करण्यात आले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना वेळेत वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात व करोना रुग्णांना त्वरित हॉस्पिटलमध्ये पोहोचता यावे, यासाठी मोफत ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती अनुप मोरे यांनी दिली.


















