- आज ६८४ जणांना कोरोनाची बाधा तर, २१ जणांचा मृत्यु; ८०६ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९. सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. २९ सप्टेंबर) रोजी ६८४ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ८०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे आकुर्डी (पुरुष ६० वर्षे), चिंचवड (पुरुष ४९ वर्षे, पुरुष ६४ वर्षे, स्त्री ७० वर्षे), वाल्हेकरवाडी (पुरुष ७१ वर्षे, पुरुष वर्षे), पुनावळे (स्त्री ५२ वर्षे, पुरुष ४८ वर्षे), पिंपळे सौदागर (पुरुष ५७ वर्षे), भोसरी (पुरुष ६८ वर्षे), मोशी (पुरुष ३० वर्षे), काळेवाडी (स्त्री), पिंपळेगुरव (पुरुष वर्षे), पिंपरी (पुरुष ७० वर्षे), सांगवी (पुरुष ७२ वर्षे), विशालनगर (पुरुष) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे जुन्नर (पुरुष ५८ वर्षे), खेड (स्त्री वर्षे), खराबवाडी (पुरुष ४३ वर्षे ), महाड ( पुरुष ४४ वर्षे), कोल्हापुर (स्त्री ७४ वर्षे) येथील रहिवासी आहे.
माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत आज अखेर १३१४ पथकांव्दारे १३५३८८६ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये १२१० व्यक्तींच्या घशातील नमुन्यांची तपासणी केली असता १७७ व्यक्ती कोविड पॉझिटीव्ह आढळून आलेल्या आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ७७३१७ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ६९०६१ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १३०६ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.


















